महाराष्ट्रात हिंगणघाट हें अनेक काळापासून सुप्रसिद्ध आहे ते तीन ‘क’ साठी एक कापूस, दोन कव्वाली आणि तीन कबड्डी.
सात गड्यांना झुंज द्यावया, मैदानी लढतो एक गडी…..विजयी क्षण तो खेचूनी येतो… नाद गुंजतो कबड्डी… कबड्डी…. कबड्डी….
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- एकेकाळी ह्या कामगार वस्तीत एक नव्हे तर दोन दोन ऑल इंडिया कबड्डीचे भव्य प्रेक्षणीय सामने होतं होते. सुभाष मंडळ व नंतर गाडगेबाबा मंडळ या दोन मंडळाच्या वतीने कबड्डी रसिकाना मैदानी खेळाची मेजवानी मिळायची. या मातीतून तयार झालेली नामवंत कबड्डीपटू स्व. बापू कोल्हे, कबड्डी टायगर म्हणून देशात ओळखल्या जाणारे स्व. काशिनाथ रिठे, हरिभाऊ राऊत, महादेव मडावी, स्व. पुंडलिक भेंडे, एकनाथ सयाम, विजय रिठे, अजय रिठे,या सारखे अनंत व असंख्य खेळाडू.
परंतु मधल्या काळात ह्या खेळाला मर्यादा आली. फेडरेशनच्या आडमुठेपणा मुळे व राजकीय हस्तक्षेपामुळे हा मैदानी खेळ हळूहळू मागे पडत गेला. तरीही गल्ली बोळात छोटे मोठे मंडळ आपले अस्तित्व ठेऊन होते. आज 7 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सुभाष बोस मंडळाचे नावाने विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवायला हिंगणघाटच्या जनतेला मिळत आहे. 9 फेब्रुवारी रोजी ह्या कबड्डी सोहळ्याचा रात्री समारोप होईल.
सुभाष बोस मंडळाचा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक देणगीदाते स्वतः हून समोर आले हें ह्या खेळाचे भाग्य. ह्या आमदार चषक स्पर्धेचे संरक्षक आ. समीर कुणावार, अध्यक्ष रितेश गावंडे, कार्याध्यक्ष रवींद्र आस्कर, सचिव धनंजय बकाणे, उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, अजय रिठे, अनिल लांबट, विजय महाबुधे, ललित देवढे, संजय चौव्हाण, उमेश कुंभेकार, गणेश काटवले, सुभाष काटकर, रवी काटवले, नरेश देवढे, राजू सेनाड, गणेश कुरेकर, निलेश लाजूरकर, कार्तिक काटकर, शुभम चौव्हाण, सूरज काटकर, प्रतीक कठाणे, इत्यादी असंख्य असंख्य युवा कार्यकर्ते जुन्याच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड परिश्रम करीत आहेत.

