सिरोंचा येथील नामांकित वकील फिरोज खान यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करतांना.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
उप पोलीस स्टेशन जीमलगट्टा येथे मा. श्री निलोत्पल सा.(पोलीस अधीक्षक गडचिरोली) मा. श्री एम रमेश सा. अप्पर पोलीस अधीक्षक, मा. श्री यतीश देशमुख सा. अप्पर पोलीस अधीक्षक अभियान मा.श्री श्रेणिक लोढा सा. अप्पर पोलीस अधीक्षक सा.अहेरी यांच्या संकल्पनेतून व मा. श्री दसुरकर सा उपविभागीय पोलीस अधिकारी जीमलगट्टा यांचे मार्गदर्शनाखाली उपपोस्टे जीमलगट्टा येथे भारत सरकार ने लागू केलेल्या तीन नवीन फौजदारी कायदे संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी सीरोंचा येथील नामांकित वकील ॲड. फिरोज खान यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम यांचे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कायद्यातील नवीन झालेले बदल तसेच पोलिसांनी नवीन कायद्यानुसार अनुसरावयाची कार्यपद्धत तसेच डिजिटल पुरावे, सायबर गुन्हे संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेसाठी शासकीय आश्रम शाळा जीमल गट्टा येथील 140 ते 150 विद्यार्थी/विद्यार्थिनी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व नवयुवक तसेच जिल्हा पोलीस व एस आर पी एफ चे अधिकारी व अमलदार हजर होते. उप पोस्टे जीमलगट्टा मा. प्रभारी अधिकारी सपोनी संगमेश्वर बिरादार सा. मा. पो उपनि ज्ञानेश्वर कोल्हे सा. यांनी सदर कार्यशाळेचे आयोजन करून नवीन फौजदारी कायदेविषयक कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

