मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार अहेरी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये (पाहिला टप्पा ) मॉडेल स्कूल अहेरी येथे आयोजित केले आहे. सदर तालुका स्तरीय प्रशिक्षणाचे
उद्घाटन अहेरीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र टिचकुले यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रशिक्षणाला प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख सुनील आईंचवार, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख विनोद पुसालवार, ज्येष्ठ मार्गदर्शक दिगंबर दुर्गे, साधन व्यक्ती व मार्गदर्शक ताराचंद भुरसे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन प्रसंगी सुलभक गोबाळे सर,सुहास मेश्राम, सचिन सिडाम, राजू नागरे, राजेश चक्रमवार, अरुण जाककोजवार,ओम भीमनपल्लीवर,सुनील तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते संचालन चिलवेलवार सर तर आभार प्रदर्शन मेश्राम सर यांनी केले.

