उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ अपघात झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
चार चाकी वाहनाने माजी आमदार बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांना तातडीने स्थानिक हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.
सदरहू वाहन हे गुरांची वाहतूक करीत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करीत असल्याने ह्या वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

