राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नालासोपारा येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या आईनेच आपल्या गर्भवती मुलीची गळा घोटून हत्या केल्याने खळबळ माजली आहे. मुलगी गर्भवती राहिली म्हणून समाज काय बोलेल म्हणून जन्मदात्या आईने लेकीला दिली भयानक शिक्षा. धक्कादायक म्हणजे आपल्याच पोटच्या मुलीची हत्या केल्यानंतर आपल्या मुलीने आत्महत्या केली असा बनाव या महिलेनं रचला होता. पण आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या निर्दयी आईला अखेर नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अस्मिता दुबे 20 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव असून ममता दुबे वय 46 वर्ष असे आरोपी आईचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेच्या यशवंत गौरव येथील फेज मधली जय विजय नगरी या इमारतीत राहणारी कॉलेजमध्ये शिकणारी 20 वर्षीय अस्मिता दुबे ही मुलगी आपल्या आई वडील तसंच लहान बहिणीसह राहत होती. गुरूवारी दुपारी तिच्या पोटात दुखू लागले आणि त्यामुळे ती अचानकची मृत्यू झाल्याची तक्रार तिची आई ममता दुबे वय 46 वर्ष हीने नालासोपारा पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. तिच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
सुरुवातीला मृतक अस्मिताने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यात दोन वेळा मृत्यूची वेगवेगळी कारणे ममता दुबे हिने सांगितली होती. मात्र मृतक अस्मिता हिचा चेहरा सुजलेला होता तसंच दोन्ही हातावर चावा घेतल्याचे व्रण दिसून आल्याने नालासोपारा पोलिसांना या प्रकरणी संशय आला आणि त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात करण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मितची ही आत्महत्या नसून गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झालं.
मुलगी गर्भवती राहिल्याने हत्या: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेली अस्मिता ही 3 महिन्यांची गरोदर राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होती. तिने मुलीला गर्भपात करण्यास सांगितलं होतं. मात्र तिने नकार दिला. मुलगी आपलं ऐकत नसल्याचं समाजात आपली समाजात थू थू होईल गावी समाजातून बाहेर काढलं जाईल. या भीतीने तिने मुलीला बेदम मारहाण केली. तिची 17 वर्षीय लहान बहिणीने तिचे पाय धरले तर आईने अस्मिताच्या दोन्ही हातावर चावा घेतला तसंच दोरीने गळा आवळून तिची हत्या केली.
मृतक अस्मिता हिचे एका तरुणा बरोबर प्रेमसंबंध जुळले होते आणि ते दोघे लग्न सुद्धा करणार होते. मात्र त्यांच्या लग्नाला आई ममताचा विरोध होता. वडील गावी गेले असताना शिवजयंतीच्या दिवशी आई आणि अल्पवयीन बहिणीने मिळून अस्मिताची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरोपी ममता दुबे हिच्यावर शनिवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 115 (2), 351 (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहे. तिची बहिण अल्पवयीन असून 12 ची परिक्षा सुरू आहे. आई ममता दुबे हिला न्यायालयात हजर केले असता 25 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.