महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमेश्वर:- येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. तेथे अवघ्या आठव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केली आहे. शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर न उठवल्याने, त्याचा राग येऊन त्या मुलीने हे टोकाचं पाऊलं उचललं आणि आयुष्यच संपवून टाकलं. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून तिच्या कुटुंबियांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शाळेत जाण्यासाठी आईने वेळेवर उठवलं नाही याचा त्या मुलीला प्रचंड राग आला. आणि त्याच रागातून तिने आत्महत्या करत जीवनाचा शेवट केला. मात्र यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी शिवकुमार पारवे यांनी घटनास्थळी भेट दिली.

