रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना संपत टकले पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जालना जिल्ह्याच्या परतुर-मंठ्याच्या मातीत निपजलेलं, रापलेलं, वाढलेलं अन पुढे सगळ्या कसोट्यांवर तावून सुलाखून निघालेलं अस्सल सोनं महणजे परतुर-मंठा तालुक्याचे माजीमंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर होय, जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात त्यांनी घेतलेली आघाडी केवळ अविश्वसनीय आहे.जालना जिल्ह्याला कर्तबगार व्यक्तिमत्वांची मोठी परंपरा आहे. जिल्ह्यातील अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर या चतुरख व्यक्तीमत्वाने सर्वच क्षेत्र व्यापून टाकले आहे. शेती, कला, क्रिडा क्षेत्रापासुन शिक्षण, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अध्यात्मिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा अधिकारवाणीने मुक्त संचार आहे. एखाद्या खेळामध्ये जसा अष्टपैलू खेळाडू असतो त्याला सर्व बाजु जमतात तसे आमदार बबनराव लोणीकर यांचे आहे. दिन-दलित, गरीब शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांत पुढे असणारे नेतृत्व महणूनही त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. त्यांचे हे व्यक्तीमत्व आणि कार्य केवळ मतदार संघापुरते, तालुक्यापुरते किंवा जिल्ह्यापुरते नाहीतर अख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.
बबनराव लोणीकर साहेब तुमचा दिवस तुम्ही आमच्यासाठी तयार केलेल्या कामाच्या वातावरणा इतकाच यशस्वी आणि फलदायी जावो. शहाणपणा आणि दयाळूपणाने नेतृत्व केल्याबद्दल तुम्हचे मनापासून धन्यवाद. तुमचा वाढदिवस आनंदाने आणि उत्सवाने भरलेला जावो अशी शुभेच्छा!

