उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगली च्या माजी अध्यक्ष सोनूताई चंद्रकांत कांबळे यांचा ७८ वा वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी श्रावस्ती विहाराचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप, विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालक चंद्रकांत चौधरी, विहाराचे सदस्य सुशील जनार्दन कांबळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले.
सोनूताई कांबळे यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिनांक 27 डिसेंबर 2007 च्या सुधारित बांधकाम परवानगी नुसार विहाराचे तळ मजल्याचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी सुमारे 20 ते 25 लाख निधी गोळा करून त्यानी स्वतः जवळचे सुमारे तीन लाख रुपये खर्च करून तळ मजल्याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचप्रमाणे तळ घराचेही बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या शांत सु-स्वभावी आनंदी आणि कणखर, प्रेमळ वृत्तीच्या असल्याने जवळजवळ 15 वर्षे बिन विरोधपणे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. खरोखर त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
सोनूताई कांबळे यांनी बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगलीचे ऑडिट रिपोर्ट करण्यासाठी सुद्धा वयाची 75 असताना तिसऱ्या मजल्यावर असलेले धर्मदाय आयुक्त कार्यालयात वेळोवेळी जाऊन पाठपुरावा केला आणि पुढील नवनिर्वाचित संचालक मंडळ तयार होण्यासाठी पाठिंबा दिला.

