मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ता. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासह सर्वांनी ही नंबर प्लेट बसवून घ्यावी लागणार आहे. पण एचएसआरपी नंबर प्लेटची किंमत बदल सरकारवर अनेकांनी प्रश्न उपस्थित करत नागरिकांना लुटणारी योजना म्हटले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शप चे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र त्यातही महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. इतर राज्याच्या तुलनेने तिपटीने अधिक रक्कम वसूल केली जात आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचे कंत्राट कोणी दिले आहे? याची त्वरित चौकशी व्हावी. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी. तसेच सदरची अवाजवी लूट रोखण्यासाठी दिलेली कंत्राटे रद्द करून सर्वसामान्यांना परवडतील असे दर आकारले जातील याची मुख्यमंत्री महोदयांनी खात्री करावी. नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देखील द्यावी. असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

