शासनाने दिली अहेरी, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व एटापल्ली येथील योजनेला तांत्रिक मान्यता -*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
. अहेरी – अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अथक प्रयत्नातून आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात पाच मोठे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेले असून त्याबाबतची तांत्रिक मान्यता मिळाली आहे व उर्वरित प्रक्रिया शासन स्तरावर सुरु असून मा. आमदार डॉ. धर्मरारावबाबा स्वतः या विषयाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
. विधानसभा क्षेत्रात एकूण पाच मोठ्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून त्यापैकी अहेरी नगर पंचायत क्षेत्रासाठी 52.00 कोटी, भामरागड नगर पंचायतीसाठी 64.00 कोटी, सिरोंचा करिता 72 कोटी व एटापल्ली करिता 62.00 कोटी च्या योजनेला तांत्रिक मान्यता प्राप्त झालेली असून प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही चालू आहे व नजीकच्या काळात ह्या सर्व योजनाच्या बांधकामला सुरवात होईल. या व्येतिरिक्त मुलचेरा नगरपंचायत येथील पाणीपुरवठा योजेनेच्या तांत्रिक मान्यतेचे काम सुरु आहे.
. संबंधित पाचही नगर पंचायत प्रशासनाला सदरचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे शासनाकडून निर्देश आलेले असून त्याबाबत सर्व्हे चे काम पूर्ण करण्यात आलेले असून,पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच सदर योजनेला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.
. या पूर्वी आ. आत्राम यांनी जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी अहेरी पाणीपुरवठा योजनेसाठी आपली स्वतःची जमीन शासनाला निशुल्क दान करून अहेरीकर जनतेला पिण्याचे पाणी पुरवठा होण्यास मोट्ठी मदत केली होती हे इथे उल्लेखनीय.आता सुद्धा अहेरीतील गड अहेरी बामणी, चेरपल्ली येथील जनतेला उन्हाळ्यात जो पाण्याची टंचाई भासत होती ती यापुढे होऊ नये, तसेच इतर पाचही नगर पंचायत क्षेत्रात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी एक योजना तयार करून शासनाकडे त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला, व त्यांच्या प्रयत्नाचे यश आज दिसत आहे. बाबांच्या या विधायक कार्यासाठी सर्वत्र त्यांचे आभार मानून समस्त जनता बाबांचे अभिनंदन करीत आहे.

