अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ५ मार्च:- हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या अतोनात छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सर्वात मोठा शत्रू हजारो मंदिरे तोडणारा औरंग्या अबु आजमी ला आपला आदर्श वाटावा यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही. पण ह्या विकृत विधानाबद्दल औरंगजेबाचे समर्थन करून महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. करिता या देशद्रोही नेते व सपाचे आमदार अबु आजमी यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर नाक घासून माफी मागावी. या आशयाचे निवेदन सावनेरचे भाजप शहर अध्यक्ष भीमराव घुगल यांच्या नेतृत्वात सावनेर पोलीस स्टेशन निरीक्षक उमेश पाटील यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी भाजप नेते रामराव मोवाडे, मंदार मंगळे, भीमराव उर्फ राजू घुगल ,तुषार उमाटे, महेश चकोले, पिंटू सातपुते, आशिष फुटाणे, दिगंबर सुरतकर, शालिक मोहतुरे, बापू सुरे, राधेश्याम उलमाले, नरेंद्र ठाकूर, मिलिंद गिरडकर, हरीश महोतकर, प्रज्वल कांबळे, प्रवीण नारेकर, आशिष मानकर, महेश चकोले, सचिन सावंत मोहन कानफाडे ,राजेश बोडखे, विजय लाड, छगन सोनभद्रे, प्रकाश दुबे सह अनेकांची उपस्थिती होती.

