प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- दिनांक १६ मार्च रोजी वर्धा येथे ना. पंकज भोयर पालकमंत्री वर्धा जिल्हा तथा राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना वर्धा जिल्ह्यातून गेलेला शक्तीपीठ महामार्ग भोजाजी महाराज देवस्थान आजनसराला जोडण्यात यावे यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी विजय पर्बत अध्यक्ष भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा, अटल पाण्डेय, गणपत गाडेकर अध्यक्ष माता मंदिर देवस्थान हिंगणघाट, अक्षय बेलेकर संघर्ष समिती सहसचिव, प्रवीण कडू अध्यक्ष निसर्ग साथी संघटना ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.

