मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट, वर्धाच्या माध्यमातून आज दिनांक 20 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता वाघोली या गावातून वाहणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून वाघोली ते धाबा जाणाऱ्या नाल्याचे खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जमनलाल बजाज फाउंडेशनचे श्री. भार्गव व वना नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश राजूरकर प्रवीण भोंगाडे बजाज फाउंडेशन कॉन्ट्रॅक्टर नरेश काचवे यांच्या उपस्थितीत शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मागील कितीतरी वर्षापासून या नाल्याचे पाणी वाघोली या भागात मोठ्या प्रमाणात शिरत असल्यामुळे प्रत्येक वर्षी या संपूर्ण भागातल्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत होते. त्यांना पूरस्थितीचा सामना करावा प्रत्येक वर्षी करावा लागत होता. यामुळे येथील काही सुज्ञ शेतकऱ्यांनी नाल्याच्या खोलीकरणा संदर्भात पाऊल टाकले व या परिसराचे संपूर्ण खोलीकरण करण्याचे मानस संपूर्ण शेतकऱ्यांनी बजाज फाउंडेशन ला दहा टक्के निधी जमा करून या कामाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवारातले शेतकरी कमलाकर देशमुख, दत्तात्रेय रघाराटे गजानन झाडे, नरेंद्र मडावी, उमेश दूरगरवार, कडूजी वाटमोडे, शांताराम भट, प्रशांत पिसे, नितीन पिसे, गजानन झाडे, राजू उमाटे, नानाजी मडावी, विष्णुपंत दिवाणजी व वाघोली गावातील सर्व शेतकरी या कार्यक्रमाला सहभाग होता.

