प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर शाखा – हिंगणघाट अंतर्गत समुद्रपूर परिसर यांच्या सौजन्याने व सर्व सेवकांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूरच्या पटांगणावर मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व मार्गदर्शन म्हणून हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधिर कोठारी, समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर व नगर पंचायत समुद्रपूरच्या नगराध्यक्षा योगिता सचिन तुळणकर हे होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष प. पू. प. एक सेवक मंडळ नागपूर राजु मदनकर या कार्यक्रमाचे उद्घाटक कोषाध्यक्ष प. पू. प. एक सेवक मंडळ नागपूर प्रविण उराडे तसेच प्रमुख पाहुणे सचिव प. पू. प. एक सेवक मंडळ, नागपूर सुरज अंबुले, सहसचिव मोरेश्वर गभगे, संचालक फकिराजी जिभकाटे, वासुदेव पडोळे, संजय महाकाळकर, विठ्ठलराव क्षीरसागर, टिकाराम भेंडारकर व व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर मंडळी तसेच समस्त सेवक व सेविका मोठया संख्येने उपस्थित होते.