मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालय हिंगणघाट येथे विद्यार्थ्यांकरिता मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन स्वर्गीय आप्पाजी जोशी स्मृती सेवान्यास हिंगणघाट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती नागपूरच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
दिनांक 18 व 19 मार्च 2025 या दोन दिवशी भारत माध्यमिक उच्च माध्यमिक विज्ञान महाविद्यालय, हिंगणघाट मध्ये स्व. आप्पाजी जोशी स्मृती सेवा न्यास हिंगणघाट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा वर्धाचे संघचालक जेठानंदजी राजपूत, विनय आंबूलकर, प्रकल्प समन्वयक लोककल्याण समिती नागपूर, विवेक भिस्मा व्यवसाय कार्य प्रमुख नागपूर, मुख्याध्यापक हरीश भट्टड, उपमुख्याध्यापक किशोर चवरे, पर्यवेक्षिका मनीषा कोंडावार, निलाक्षी बुरिले उपस्थित होते.
या शिबीराबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन विनय आंबुलकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा आहार कसा असला पाहिजे व हिमोग्लोबिनची आवश्यकता शरीरात किती आहे याची सविस्तर माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक हरिष भट्टड यांनी या शिबिराकरीता शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती नागपूर यांच्याकडून तपासणी करण्याकरीता पवन बावनकुळे, कु. पायल मलाधारी, कु. प्रतीक्षा देशमुख, कु. गौरी बिसेन, मिथिलेश शुक्ला, अमित भुरे यांनी सर्वांनी रक्त तपासणीचे कार्य केले.
दोन दिवस चालणाऱ्या रक्त तपासणी शिबिरात मध्ये विद्यालयातील जवळपास पंधराशे विद्यार्थी सहभागी होतील अशा प्रकारचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. शाळेच्या वतीने उपमुख्याध्यापक किशोर चवरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना म्हणाले की पुढेही अशाच प्रकारचे सहकार्य आणि सेवा कार्य आमच्या शाळेला लाभतील असा निश्चय करून सर्वांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन त्रिशूल लोंढेकर यांनी केले

