अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २३ मार्च:- सावनेर शहरातील निमा-होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शहिद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपले सामाजिक बांधिलकी चा परिचय दिला. रविवार २३ मार्च ला सकाळी १०.३० वा. सावनेर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड शैलेश जैन यांच्या अध्यक्षतेखाली, माजी नगराध्यक्ष अँड् अरविंद लोधी यांचे प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ चिकित्सक डॉ.विजय धोटे, डॉ.कुष्णराव भगत, डॉ.जे.टी. काळे, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. शिवम पुण्यानी,होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष राहुल दाते, निमा अध्यक्ष छत्रपती मानापुरे, निमाचे माजी अध्यक्ष संजय दोरखंडे, प्रशांत राजपूत आदींच्या उपस्थितीत हेडगेवार रक्त पेढी व्दारे युनिट रक्त संकलित केले.
याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.विजय धोटे, माजी नगराध्यक्ष अँड.अरविंद लोधी, डॉ. भगत, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष परेश झोपे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश जैन आदींनी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदींची देशभक्ती व बलिदानावर प्रकाश टाकत रक्तदानाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमात ५९ व्यांदा रक्तदान करणारे होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ.राहुल दाते, तसेच शहरात आयोजित होणाऱ्या प्रत्येक रक्तदान शिबीरास सहकार्य करणारे आस्था पँथालाजी लँबचे संचालक, डॉ.प्रवीण चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भूषण कुबडे, मदन डहाके, प्रवीण नारेकर, युवा पत्रकार मयुर नागदवने आदींचा शाल व वृक्ष देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक डॉ.राहुल दाते यांनी तर डॉ. विकास चोपडे यांनी आभार मानले. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी डॉ.स्वप्नील काळे, डॉ.नितीन सोमकुवार, डॉ.आकांक्षा निनावे,डॉ.निरज दुबे, डॉ.नेहा जैस्वाल, डॉ.वैशाली दाते, डॉ.मुर्फी गजभिये, डॉ.विशाल पांडे आदींनी परिश्रम घेतले.

