मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*स्थानिक एटापल्ली* येथील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीच्या माजी अध्यक्ष स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांची पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात सहभागी महाविद्यालयाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस एन बुटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रोफेसर डॉ सुधीर भगत सर होते.
तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित प्रा.डॉ.बि.डी. कोंगरे इंग्रजी विभाग प्रमुख, डॉ.विनोद पत्तिवार ग्रंथालय प्रमुख, प्रा.डॉ.संदीप मैंद रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, प्रा.डॉ विश्वनाथ दरेकार राज्यशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.निलेश दुर्गे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा.डॉ.राजीव डांगे रसायनशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.भारत सोनकांबळे, प्रा डॉ श्रुती गुब्वावार रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तथा प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.अतुल बारसागडे, प्रा. चिन्ना पुंगाटी इतिहास विभाग प्रमुख, प्रा.राहुल ढबाले सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा.डॉ.साईनाथ वडस्कर होते. यावेळी कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

