मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
एकुण 87 गुन्ह्रांमधील मुद्देमाल करण्यात आला नष्ट
गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे आदेशान्वये जिल्ह्रातील अवैध दारु विक्री करणायांवर कठोर कार्यवाही केली जात असते. त्याअनुसार विविध पोस्टे येथे दाखल गुन्ह्रांमध्ये जप्त मुद्देमाल हा नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवार्इंदरम्यान देखील मुद्देमाल जप्त होत असल्याने जागे अभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते. यावरुन पोस्टे गडचिरोली येथे दाखल एकुण 87 गुन्हयांमधील महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक 28/03/2025 रोजी नष्ट करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे की, मा. न्यायालय व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल दिनांक 28/03/2025 रोजी पोस्टे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चंदन भगत व शु. के. चौधरी यांच्यासह पोस्टे गडचिरोली हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्रांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात 1) देशी दारुच्या 90 मिली मापाच्या 14027 प्लॉस्टीक बॉटल, 2) विदेशी दारुच्या 2000 मिली मापाच्या 55 प्लॉस्टीक बॉटल, 3) विदेशी दारुच्या 750 मिली मापाच्या 29 काचेच्या बॉटल, 4) विदेशी दारुच्या 375 मिली मापाच्या 71 काचेच्या बॉटल, 5) विदेशी दारुच्या 180 मिली मापाच्या 709 काचेच्या बॉटल, 6) विदेशी दारुच्या 90 मिली मापाच्या 49 काचेच्या बॉटल, 7) बियरच्या 650 मिली मापाच्या 09 काचेच्या बॉटल, 7) बियरच्या 500 मिली मापाच्या 287 टिनाचे कॅन याप्रमाणे एकुण 15,60,194/- (अक्षरी:- पंधरा लाख साठ हजार एकशे चौयान्नऊ) रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबिच्या सहाय्याने 15 न् 15 फुटाचा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टीकच्या बॉटलांचा चुरा करण्यात आला त्यानंतर काचेचा चुरा व प्लास्टीकच्या चेपलेल्या बॉटल जेसीबीच्या सहाय्याने खड¬ात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोली येथील प्रभारी अधिकारी पोनि. रेवचंद सिंगनजुडे व पोहवा/चंद्रभान मडावी यांनी पार पाडली.

