संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दि. १४ एप्रिल माहामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती संविधान चौक (पंचायत समिती राजुरा) येथे साजरी करण्यात आली, सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनोद बारसिंगे, विलास पाटील, विजय जुलमे यांनी मालार्पन केले. यावेळी श्री. करमणकर यांनी निळया ध्वजाचे ध्वजारोहण केले यावेळी सच्चिदानंद रामटेके व योगेश करमणकर यांनी सुध्दा ध्वजारोहण करण्यात सहकार्य केले. त्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. बुद्ध वंदना झाल्यानंतर काही मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पन केले.
यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुर्दशन निमकर, ॲड. अरुण धोटे, अरुण मस्की, वाघुजी गेडाम, बापूभाऊ धोटे, सत्यपाल कातकर, ॲड. चंद्रशेखर चांदेकर, अँड. वाघमारे, इंजि. प्रकाश शेंडे, मिलिंद झाडे, ॲड. भिमराव दुर्गे, निवारण कांबळे, विवेक बक्षी, मुरलीधर ताकसांडे, रुषी रायपुरे, किशोर रायपुरे, आणि इतर मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पन केले.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून सरबत वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सतिश शिंदे, मार्गदशक प्रा, अनंत डोंगे, राहुल थोरात, अंकुश भोंगळे, राकेश कलेगुलवार, लोकेश पारखी, कैलास कार्लेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. या सरबतचा आस्वाद येथील सर्व जणतेनी मोठ्या आनंदाने घेतला. जयंतीचा कार्यक्रम पुतळा समितीचे रमेश नळे, योगेश करमणकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश नळे आणि विनोद निमसटकर यांनी केले. तसेच सर्वांचे आभार सुध्दा रमेशभाऊ नळे यांनी मानले.

