काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष डॉ, निसार हकीम यांची खासदार नामदेवराव किरसान यांच्या कडे मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी . मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा भिमरगुडम आणि कोडशेलगुडम या भागातील शेतजमिनी वन विभागाकडून बडजबरीने परत घेण्याचा अमानुष प्रकार चालू आहे . ज्या शेतजमिनी शेतकरी तीन ते चार पिढ्यांपासून उदरनिर्वाहासाठी अतोनात कष्ट करीत आहे. अश्या जमिनी वनविभाग जबरन अतिक्रमण चे कारणे देत जमिनी परत घेण्याचा अमानुष प्रकार या भागात सर्रास पणे चालू आहे. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांकडून जमिनी हिसकावून घेतल्यास शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी साधनच उपलब्ध नाही. पिढ्यानपिढ्या शेतात कष्ट राबविणणारे शेतजमिनी प्रशासनाने शेतकऱ्यांना सरसकट वन पट्टे उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी आहे.तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी चार हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन नियम असताना सुद्धा वनविभाग प्रशासनाने शेतकऱ्यांना कोणतीच पूर्वकल्पना न देता पोलिसांचा ताफा लावून जेसीबी,ट्रॅक्टर साहाय्याने शेतजमिनी बडकावण्याचा अमानुष प्रकार या कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत चालू आहे याची माहिती तालुकाध्यक्ष डॉ.अ.निसार हकीम यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट दिली शेतकऱ्यावर चालू असलेल्या अमानुष अन्यायाची गावकऱ्या समक्ष ब्रह्मणध्वनी मार्फत आपबिती खासदार डॉ,नामदेव किरसान यांना सांगितली तसेच घटनेची गंभीरता लक्षात घेता आपल्यामार्फत तात्काळ शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सरसकट वनहक्क पट्टे आणि शेतजमिनी परत मिळवून देण्यात यावे ही विनंती केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ.अ.निसार हकीम यांच्या सोबत काँग्रेस शिस्ट मंडळ चे एस.सी. तालुकाध्यक्ष रामप्रसाद मुंजमकर, सत्यनारायण डोंगरे,अशोकभाऊ आईंचवार ,मधुकर सडमेक, गणेश उपलपवर ,संतोष लेनगुरे ,कृष्णदादा ,महेश बोराळे आदी कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते .

