मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
देसाईगंज येथे
सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज यांच्या नियोजनात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७१व्या पदस्पर्श दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक मा. कुलदीप रामटेके साहेब से. नि. अधिक्षक अभियंता, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असो.ऑफ इंजिनिअर्स ( इंडिया) यांनी डॉ. बाबासाहेबांच्या ज्ञात नसलेल्या अनेक आठवणींवर प्रकाश टाकून वातावरण भारावून टाकले. तसेच भविष्यात समाजाचा उत्कर्ष साधायचा असेल तर बौद्ध धम्माच्या तत्वांचे पालन करुन व्यवसायीक जाळं निर्माण करणे आवश्यक आहे अन्यथा येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे असे प्रतिपादन केले.यावेळी त्यांनी प्रोजेक्टर वर walking with Buddha या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झालेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनावर आधारित हिंदी लघु चित्रपटाची चित्रफित दाखविली.कार्यक्रमाचे उद्घाटक जयप्रकाश अंबादे साहेब से. नि. अव्वर सचिव महाराष्ट्र शासन हे होते तर विशेष अतिथी म्हणून जयश्री अंबादे, श्यामला राऊत, रंजना मोहोरकर होत्या.सत्कार मूर्ती म्हणून मा. डॉ. कुलभूषण रामटेके साहेब मुख्याधिकारी न. प. देसाईगंज व चंदुराव राऊत सा. कार्यकर्ते देसाईगंज होते.
दान पारोमिता प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणणारे मा. चंदुराव राऊत यांनी त्यांच्या आई मानकूबाई राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एप्रिल महिन्याचा पेंशन चेक समितीला प्रदान केला . हे त्यांचे चौथे वर्ष होय याप्रसंगी महिला समिती तर्फे राऊत दाम्पत्याला शाॅल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरीता बारसागडे, संचालन जयश्री लांजेवार तर आभार महिला समिती च्या सचिव ममता जांभूळकर यांनी केले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला समिती चे सल्लागार मारोती जांभूळकर सर, तसेच प्रकाश बारसागडे, संजय मेश्राम, डांगे सर, प्रविण मूझूमकर ,बंडू सिडाम, दुधराम शेंडे, जागेश्वर माने, इंजि. नुसार फुले, भूषण सहारे, राजू माटे, महिला समिती च्या अध्यक्षा कविता मेश्राम, सदस्य रत्नमाला बडोले, यशोदा मेश्राम, गायत्री वाहाणे,लीना पाटील, प्रतिभा बडोले, प्रतिमा शेंडे, सुनिता नंदागवळी, दुर्गा रंगारी पौर्णिमा बोरकर यांनी परिश्रम घेतले.