मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सामाजिक संस्थे अंतर्गत शिक्षणाचा पुनर्प्रयास या कार्यक्रमांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील 97 महिलांना 17 नंबरचा फॉर्म भरून दहावीचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी देण्यात आली. या महिलांसाठी रात्रीच्या वेळी विशेष शाळांचे आयोजन करण्यात आले. त्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात आले आणि परीक्षा पूर्व प्रशिक्षणही देण्यात आले.
या उपक्रमात 86 महिलांनी प्रत्यक्ष दहावीची परीक्षा दिली. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जामणी गावातील इंदुबाई सातपुते बोरकर या 67 वर्षांच्या आजीबाईंनी 51 टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. त्यांचे हे यश वयाच्या बंधनांवर मात करत शिकण्याची प्रेरणा देते.या उपक्रमामागे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रतिनिधी अमोल इटेकर (मो. 9673683104) यांचे मोलाचे योगदान आहे. महिलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले.

