संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील छोट्याशा तुलाना या गावातिल अभिनय दिनेश मडावी याने महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथिल दहावि बोर्डाच्या परीक्षेत 91.20% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले. तुलाना या गावातिल प्रथमच विद्यार्थी आहे ज्याने 91.20 च्या वर गुण घेतले.
अभिनय दिनेश मडावी याचा या यशाबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे तालुकाध्यक्ष मनोज आत्राम, दिपक मडावी, तालुका सचिव व ईतर पदाधिकारी यांनी अभिनयला पुष्पगुच्छ देऊन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अभिनय याने कोनतिहि शिकवनि वर्ग न लावता स्वतःच्या मेहनतीने यशाचे शिखर गाठले. अभिनयने यशाचे श्रेय वडिल दिनेश मडावी. आई सपना मडावि. व मोठे बाबा सचिन मडावी. व शाळेतिल मुख्याध्यापक श्री मेश्राम सर तसेच वर्ग शिक्षिका बेलोरकर मॅडम व ईतर शिक्षकांना दिले आहे

