प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील नामवंत समाजसेवक अनिल जवादे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत भारतीय संविधानाप्रती आपली निष्ठा दाखवीत 26 नोव्हेंबर या चित्रपटाची निर्मिती केली. हे साहस त्यांनी दाखविले हे खूप मोठे कार्य आहे. तसेच त्यांची कन्या डॉं.जुही अनिल जवादे यांनी सुद्धा 26 नोव्हेंबर या चित्रपटा द्वारे अभिनेत्री म्हणून चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केलेले आहे. हिंगणघाट वासियांकरिता ही गौरवाची व अभिमानाची बाब आहे. अशा कृतिशील लोकांचा गुणगौरव करणे हे गरजेचे आहे. म्हणून प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व सदस्यांनी अनिल जवादे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. यावेळी 26 नोव्हेंबर चित्रपटाचे निर्माते अनिल जवादे, अभिनेत्री डॉ.जुही अनिल जवादे यांना सन्मान चिन्ह, शाल व वृक्ष देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, काँग्रेसचे जेष्ठ नेते शालीकराव डेहणे पाटील, रफिक पत्रकार, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी नगरसेवक अशोक पराते, माजी नगरसेवक राजेश भाईमारे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, दिव्यांग सेलचे प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग, विधानसभा बूथ प्रमुख अमोल बोरकर, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, विजय तांमगाडगे, शिक्षक सेलचे जगदीश वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, किशोर चांभारे, समीर बाळसराफ, उमेश नेवारे, नितीन भुते, सुनिल भुते, अमित रंगारी, सुशील घोडे, सुरेश गायकवाड, सुनिल ठाकरे, हुकेश ढोकपांडे, रवी मेसेकर, आकाश हुरले आदी उपस्थित होते.

