Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 22, 2025
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट शहरातील डंकीन येथील बंधारा बांधकामासाठी वणा नदी पात्रातून करण्यात आलेल्या अवैध रेती उपसावर करणाऱ्या पियुष इन्फ्रा कंपनीवर कठोर कारवाई करा- अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस, रा.कॉ.श.प.पक्ष

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील डंकीन येथील बंधारा बांधकामासाठी वणा नदी पात्रातून करण्यात आलेल्या अवैध रेती उपशावर कार्यवाही करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी रा.कॉ.पक्ष शरदचंद्र पवार आक्रमक असून आज तहसिल कार्यालयात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील डंकीन परिसरात सध्या सुरू असलेल्या बंधारा बांधकामासाठी औरंगाबाद येथील एका कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. परंतु, या बांधकामासाठी वापरण्यात येणारी रेती ही वणा नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या आणि कोणतीही वैध परवानगी न घेता उपसली गेली आहे, हे धक्कादायक वास्तव नुकतेच समोर आले आहे. पियुष इन्फ्रा कंपनी नावाच्या ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा करून साठा केला असून, यासंदर्भात महसूल विभागाचे नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन रेती साठ्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

आम्ही महसूल विभागाच्या या तत्परतेचे स्वागत करतो. मात्र, वणा नदी ही आमच्या जीवन रेषेसारखी असून तिचे संरक्षण हे आमचे कर्तव्य आहे. या प्रकारामुळे नदीपात्रातील पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नदीवरील बेकायदेशीर रेती उपसा केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर भविष्यातील जलसंकटाचे बीज आहे. त्या अनुषगाने आम्ही खालील मागण्या करीत आहोतः या प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.दोषी ठेकेदार व नागपूर पाटबंधारे विभागाच्या (दक्षिण) कार्यकारी अभियंता प्रांजली टोंगसे तसेच पाटबंधारे विभागीयनाचे हिंगणघाटचे उपविभागीय अभियंता अशोक घुमडे या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा पूर्वीच्या बंधाऱ्याप्रमाणेच याही बंधाऱ्याच्या कामात गडबड होऊन शासनाचा पैसा वाया जाईल.

जिल्ह्यातील सर्व बांधकाम प्रकल्पांवर नदी पात्रातील रेती उपशावर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात यावी. वणा नदीच्या संपूर्ण परिसरात नदी संवर्धनासाठी स्पष्ट मार्गदर्शक नियमावली तयार करून अंमलात आणण्यात यावी.सदर बंधाऱ्याचे काम यापूर्वी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर याचे द्वारा वर्धा पाटबंधारे विभाग वर्धा यांचेकडे देण्यात आले होते. परंतु नंतर हा निर्णय बदलून नागपूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) यांच्याकडे देण्यात आले. या मागचा काय उद्देश असावा? याची चौकशी करण्यात यावी. तरी सदर काम पूर्ववत वर्धा पाटबंधारे विभागाकडे देण्यात यावे कारण वर्धा येथून हिंगणघाटचे अंतर नागपूर पेक्षा जवळ असून त्यांना सदर कामावर लक्ष देणे सोयीचे आहे. असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा द्वारे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, रफिक पत्रकार, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी नगरसेवक अशोक पराते, माजी नगरसेवक राजेश भाईमारे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे,दिव्यांग सेलचे प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, अमोल बोरकर, अल्पसंख्याक सेल प्रदेश सरचिटणीस हिमायू मिर्झा बेग, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जगदीश वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, किशोर चांभारे, समीर बाळसराफ, उमेश नेवारे, नितीन भुते, सुनिल भुते, अमित रंगारी, सुशील घोडे, सुनिल ठाकरे, हुकेश ढोकपांडे, रवी मेसेकर, आकाश हुरले आदी उपस्थित होते.

Tags: वना नदीतून अवैध रेती उपसा वर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक.
Previous Post

मोटर सायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

Next Post

जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत मारली बाजी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत मारली बाजी.

जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत मारली बाजी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In