अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- छोट्या छोट्या सहकार्यासाठी एकमेकांप्रति धन्यवाद म्हणणारे आम्ही अनादी काळापासून सर्व जिवजंतू व मानव जातीला निःस्वार्थ भावनेने शुद्ध हवा, पाणी, ऑक्सिजन, फळ अशा सर्वच बाबी निशुल्क देणाऱ्या झाडांप्रति कृतज्ञ असणे अनिवार्य ठरते.
२१ मे हा दिवस चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभूषण स्व. सुंदरलाल बहुगुणा यांचा स्मृतिदिन वृक्ष कृतज्ञता दिन म्हणून हेमंतवन येथे साजरा करण्यात आला. मागील ३ वर्षांपासून पर्यावरण संवर्धन संस्था २१ मे या दिवशी झाडांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आहे. पाहुण्यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे पूजन करून व झाडांना आलिंगन देऊन वृक्षाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक डॉ. प्रकाश लाहोटी सर तर प्रमुख पाहुणे राजेंद्र कोंडावार सर, विजय धात्रक सर उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन संस्था ही नेहमीच अभिनव उपक्रम राबवित आलेली आहे. आणि पर्यावरण रक्षणार्थ सदैव खंबीर भूमिकाही मांडत आलेली असल्याचे डॉ. प्रकाश लाहोटी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. तर वृक्ष कृतज्ञता का व्यक्त करावी व स्व. सुंदरलाल बुहूगुणा यांच्या अफाट कार्यावर राजेंद्र कोंडावार यांनी माहिती दिली. सामाजिक वनीकरनचे विजय धात्रक यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी तर आभार नरेंद्र मेघरे यांनी मानले. यावेळी नितीन सिंगरू, माजी नगर सेवक मनिष देवढे, दर्शन बाळापुरे, विनय मोरे, धनराज कुंभारे, प्रदीप गिरडे, राकेश फुटाणे, उमेश डेकाटे, प्रमोद माथनकर, निलेश बलखंडे, रोहन बनसोड, संतोष चौधरी, मनोज चिताडे उपस्थित होते.
२१ मे हा दिवस “राष्ट्रीय वृक्ष कृतज्ञता दिवस” जाहीर व्हावा असा प्रस्ताव वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांना सादर करण्यात आला. या अभिनव संकल्पनेतून जनमनासात वृक्षाप्रति आपुलकीची भावना निर्माण होणार असल्यामुळे जुलै महिन्यात लोकसभा अधिवेशनात हा प्रस्ताव नक्कीच मांडणार असे आश्वासनही त्यांनी दिले.
आमदार समिर कुणावार यांनाही हा प्रस्ताव सादर करण्यात आला. वृक्ष कृतज्ञता ही संकल्पना अतिशय सुंदर असून सदर प्रस्ताव हा राज्याचे मुख्यमंत्री यांना देणार असल्याचे आमदार कुणावर बोलले.

