मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दि. 27/05/2025
गडचिरोली :- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पंचवटी नगर, गडचिरोली येथे श्रद्धा, संस्कृती आणि सेवा यांचा संगम साधणारा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तसेच भव्य महाजलाभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले.
या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन भाजपा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत वाघरे यांच्या शुभहस्ते महाजलाभिषेक व महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांनी समाजकल्याण, शांती व समृद्धीसाठी देवाकडे साकडे घातले. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला भाजपा ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, योगिताताई पिपरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, विवेकजी बैस, नीताताई बैस व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, तसेच भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदिर परिसरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाच्या माध्यमातून अहिल्याबाईंच्या निस्वार्थ, धर्मपरायण व सेवाभावी कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांना आधुनिक समाजात पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

