पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस हद्दीत येणाऱ्या भीमनगर येथे राहणाऱ्या पती पत्नीच्या घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पतीने बनाव रचून पत्नीचा मृत्यू हा हृदयविकाराचा धक्काने झाल्याचे भासवले.
या दुःखद घटनेत सुरुवातीला हा हत्या नसून हृदयविकाराचा धक्का असल्याचे पतीने भासवलं. मात्र महिलेच्या कुटुंबीयांना तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसल्या. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे पोस्टमॉर्टममध्ये या हत्येची सत्यता समोर आली आहे. या घटनेतील आरोपी पती हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शीतल जॉन्सन मंडपे वय 39 वर्ष असे मृतक पत्नीचे तर जॉन्सन मंडपे वय 41 वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे.
कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीची हत्या: प्राप्त माहितीनुसार, मंडपे दाम्पत्यात गेल्या सात वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून वेगवेगळे राहत होते. शिवाय शीतल आणि जॉन्सनला दोन लहान मुले देखील आहेत. दरम्यान शीतल आणि जॉन्सन मध्ये काही कारणावरून वाद झाला आणि कालांतराने तो उफाळून आला. त्यातच 22 मेच्या रात्री शीतल घरी एकटीच असताना सकाळच्या सुमारास जॉन्सनने शेजाऱ्यांना सांगितले की, तिचा रात्रीच्या सुमारास अचानक हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र वादाची पार्श्वभूमी लक्ष्यात घेता शीतलच्या नातेवाईकांनी या मृत्यूवर संशय आला. त्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर पाहणी केली असता शितलच्या शरीरावर ओरखडे, जखमा आणि गळा दाबल्याचे व्रण स्पष्टपणे दिसलेच, शिवाय चादरीवर रक्ताचे डागही आढळून आले. यावरुन या खुनाची सत्यता समोर आली आहे.

