मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
**आरमोरी, गडचिरोली (५ जून २०२५):** भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) गडचिरोली जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन आज आरमोरी येथील डॉ. आंबेडकर भवनात मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या अधिवेशनात कॉ. देवराव चवळे यांची जिल्हा सचिवपदी पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली, तर कॉ. ॲड जगदीश मेश्राम आणि कॉ. सचिन मोतकुरवार यांची जिल्हा सहसचिव म्हणून निवड झाली.
अधिवेशनाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने झाली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉ. डॉ. महेश कोपुलवार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. शिवकुमार गणवीर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. हौंसलाल रहांगडाले यांनी निरीक्षक व मार्गदर्शक म्हणून या अधिवेशनाला उपस्थिती लावली.
सुरुवातीला, गेल्या तीन वर्षांत निधन पावलेले पक्ष सदस्य, अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी, ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या (AIYF) राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा नेते कॉ. सचिन मोतकुरवार यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.
कॉ. हौंसलाल रहांगडाले यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यांनी आपल्या भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे यांनी राजकीय व कामकाजाचा अहवाल सादर केला, तर कॉ. ॲड जगदीश मेश्राम यांनी संघटनात्मक अहवाल मांडला. या दोन्ही अहवालांवर उपस्थित प्रतिनिधींनी सखोल चर्चा केली.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात, २५ सदस्यांच्या नवीन जिल्हा कौन्सिलची सर्वानुमते निवड करण्यात आली.
१) कॉ. डॉ. महेश कोपुलवार, २) कॉ. ॲड जगदिश मेश्राम, ३) कॉ. प्रकाश खोब्रागडे, ४) कॉ. संजय वाकडे, ५) कॉ. मारोतराव नरूले, ६) कॉ. केवळराम नागोसे, ७) कॉ. सुरेश फुकटे, ८) कॉ. मिनाक्षी सेलोकर, ९) कॉ. हरिदास निकुरे, १०) कॉ. डंबाजी नरूले, ११) कॉ. प्रेमिला मने, १२) कॉ. रेखा जांभूळे, १३) कॉ. तुलाराम नेवारे, १४) कॉ. उपेंद्र बावणे, १५) कॉ. प्रकाश ठलाल, १६) कॉ. मोहन झोडे, १७) कॉ. राजीराम उईके, १८) कॉ. देवराव चवळे, १९) कॉ. जलील पठाण, २०) कॉ. रोहीदास फुलझेले, २१) कॉ. सचिन मोतकुरवार, २२) कॉ. सुरज जक्कुलवार 23) गीता दसरवार व ईतर एटापल्ली तालुक्यातील सदस्यांकरिता रिक्त ठेवण्यात आले
तसेच, नाशिक येथे २२ ते २४ जून २०२५ दरम्यान होणाऱ्या पक्षाच्या राज्य अधिवेशनासाठी गडचिरोली जिल्ह्यातून ८ प्रतिनिधी निवडण्यात आले.
अखेरीस, नवनिर्वाचित जिल्हा कौन्सिलमधून जिल्हा सचिव व सहसचिवांची निवड जाहीर करण्यात आली. कॉ. देवराव चवळे यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी आगामी काळात जिल्ह्यात पक्षाची ध्येयधोरणे आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कॉ. सचिन मोतकुरवार यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर अधिवेशनाची सांगता झाली. या अधिवेशनाला जिल्ह्यातील ६५ प्रतिनिधी उपस्थित होते.
