अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ८:- सावनेर तालुक्यातील पेंढरी शिवारात शेळ्या गाई चारणाऱ्या इसमावर रान हेल्याने हल्ला केला. केलेल्या हल्ल्यात देवचन्द बाजीराव उईके वय ६२ वर्ष रा. पेंढरी ता.सावनेर हे गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की, देवचंद उईके, हरिभाऊ इवनाते, विशवेश्वर उईके हे तिघेही पेंढरी च्या शिवारात नियमित गुरे बकऱ्या चारायला नेत असे नेहमीप्रमाणे ७ जुन ला सकाळी १० वा. तिघेही शिवारात आपापले जनावरे घेऊन गेले. यावेळी जनावरांनी चरायला सुरुवात केली असता अचानक जंगली रान हेल्या धावत आला. देवचंद उईके यास मागून जोरदार धडक देऊन शिंगावर घेऊन जमिनीवर आपटले. त्यात देवचंद उईके हे गंभीर जखमी झाले. सोबत व थोडे दूर असलेले सोबती हरिभाऊ इवनाते व विशवेश्वर उईके यांनी त्या रान हेल्याला हाकलून लावले. गंभीर जखमी देवचंद यांस गावाकऱ्यांच्या मदतीने पाटील हॉस्पिटल सावनेर येथे नेण्यात आले. देवचंद च्या छातीला खूब मार असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
जंगला लगत असलेल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना, गुरख्यांना व शेतकऱ्यांना अश्या परिस्थितीचा रोजचाच सामना करावा लागत असून काही महिन्याअगोदर ही रान हेल्याने अशाच प्रकारे हल्ला करुन दशरथ उईके, कपुरचंद वरखडे यांना जखमी केले होते.
खापा क्षेत्राचे आरएफओ सचिन आठवले, राउंड ऑफिसर सतीश गडलिंगे, वनरक्षक महेश कुथे, आदींनी घटनेचा पंचनामा केला आहे. गंभीर जखमी देवचन्द बाजीराव उईके हे अत्यंत गरीब असून गावाकऱ्याच्या मदतीने उपचार घेत त्यांना वनविभागातर्फे उपचार व इतर आर्थिक मदत तात्काळ मिळावी अशी मागणी रविंद्र काकडे, गेंदलाल बावनकुळे, कुणाल शेंदरे, मोहन बावनकुळे, अजित उईके, विकेश धुर्वे व गावकरी आदीं नागरिकांनी केली आहे.

