सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात मोबाईल नेटवर्कसाठी बीएसएनएलचे मोबाईल टावर उभारण्यात यावे,अन्यथा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने या परिसरातील विकासासाठी विराट जन आंदोलन करण्यात येईल.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सिरोंचा – दिनांक 15 जून 2025
गडचिरोली जिल्ह्यतील, सिरोंचा तालुका मुख्यलयापासुन 60, किमी अंतरावर असल्याला आदिवासी व अतिदुर्गम झिंगानूर विकासापासून कोसो दूर आहे आहे, या झिंगानूर गावात सन 1972, मधे शासकीय आदिवासी आश्रम शाळा उघडण्यात आली आहे, तरी झिंगानूर शासकीय आदिवासी आश्रम शाळेत आजपर्यंत महाविद्यालय करण्यात आला नाही, झिंगानूर गावात कोणत्याही बँकेच्या सोय उपलब्ध नाही. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मोबाईल फोन नेटवर्क सोय नाही, झिंगानूर ते रमेशगुडम गाव 08, किलोमीटर अंतरावर या गावाला लागुन असल्याला बारा माही वाहणारी इंद्रावती नदी येथून उपसा जलसिंचन योजना राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली, झिंगानूर येथे पशूवैधकिय अधिकारी पदे रिक्त आहे. झिंगानूर ते सिरकोंडा अंतर 17, किमी आहे, सिरकोंडा ते रोमपल्ली अंतर 8, किलोमीटर आहे, तर झिंगानूर ते रोमपल्ली एकुण अंतर 25, किलोमीटर आहे, सर्वात मोठी मुख्य रस्ता हाच आहे, या रस्त्यावरील नाल्यांवर अनेक नवीन पूल बणण्यासाठी प्रतिक्षेत आहेत,झिंगानूर पासुन 5, किमी अंतरावर नैगुंडा नाला पुलाच्या प्रतिक्षेत आहे. झिंगानूर ते मंगीगुडम रस्ता काही वर्षांपूर्वी पासुन दुरुस्ती नाही, मार्गे वाया झिंगानूर ते मंगीगुडम वाया अमडेली व सिरोंचा, जुना पाय रस्ता पक्की रस्ता बांधकाम करणे आवश्यक आहे, झिंगानूर गावात विद्युत पुरवठा करणे आवश्यक आहे, झिंगानूर ते पुल्लीगुडम, 6, किमी अंतर आहे, या रस्ता वनविभागाकडून बांधकाम करण्यात यावे. झिंगानूर चेक नं. 2, झिंगानूर चेक नं. 1, झिंगानूर माल, वडदेली, या गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतातील शेतपीक घेण्यासाठी पाण्याची सोय नाही, बेरोजगारांना कोणत्याही प्रकारची कामे करण्यासाठी हाती काम मिळत नाही, या आदिवासी भागातील नागरिक तरुण पिढी उच्च शिक्षण घेऊन सुध्दा येथील नोकरी पासून वंचित आहेत हेच युवक रोजगारासाठी तेलंगणात रवाना होत आहेत.राज्य सरकार शेतकऱ्यांना सिंचन विहिरी व बोअरवेल देत आहे परंतु झिंगानूर भागातील पाण्याची पातळी मिळत नाही हजारो फिट खोली करुन सुद्धा पाणी लागत नाही, उपसा जलसिंचन योजना राबविण्यात आली पाहिजे, शासनाने शेतकऱ्यांनासाठी,
एक नवीन लाईन मॅन नियुक्ती करावे झिंगानूर ते गडचिरोली 300 किलोमीटर अंतर आहे, झिंगानूर ते गडचिरोली एसटीबस सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या सातबारावर जुने मय्यत नावे कापून नवीन नावांची नोंद घेणे आवश्यक आहे, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना पासून येथील शेतकरी वंचित आहेत तसेच अनेक समस्या आवासून उभे आहेत शासन व प्रशासन आदिवासी भागातील विकास करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे, किमान आतातरी आदिवासी क्षेत्रातील विकास करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजे शासनाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या भागाकडे लक्ष देऊन या भागातील नागरिकांचे समस्या सोडवावे अशी मागणी करण्यात आली आहे, झिंगानूर क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ प्रणयभाऊ खुणे यांनी झिंगानूर येथे भेट दिली व येथील समस्या सोडवण्याची प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे, व प्रामुख्याने झिंगानूर परिसरात उभे असलेले मोबाईल टावर तात्काळ सुरू करण्यात यावे व या परिसरामध्ये बीएसएनएल नवीन टावर उभारून येथील मोबाईल धारकांना बीएसएनएलची दूरसंचार सेवा उपलब्ध करून द्यावा अन्यथा या भागामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विराट जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ, खुणे यांनी यावेळी
दिला झिंगानूर गावाचे प्रथम नागरिक झिंगानूर येथील सरपंच सौ निलीमाताई कारेजी मडावी, दक्षता समिती सदस्य, तथा माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कारेजी मडावी, माजी ग्रामपंचायत सदस्य. समाजसेवक. रामचंद्र कुमरी, गावातील बचत गटाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

