मधुकर गोंगले, गडचिरोली प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील शेवटचे टोकावर असलेल्या छत्तीसगड राज्यच्या सीमेलगत असलेल्या कुर्ता या गावाला आज 17 जून 2025 रोजी डॉक्टर मिताली ताई हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी भेट दिली असता अतिशय दऱ्याखोऱ्यातून वाट काडीत डोग्याच्या सहाय्याने नदीतून वाट काढत कुर्ता गावात पोहचले. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी. प्राचार्य रतन दुर्गे सर जावेद अली. सांबय्या करपेत सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.गावातील नागरिकांना गावातील समस्या बद्दल विचारणा केली असता गावात एकूण 7 कच्ची घरे आहेत तर तीन घरकुल अपूर्ण अवस्थेत आहे. इतरही कुटूंबियानी घरकुल ची मागणी केली.मागील 4वर्षा पासून स्वस्त धान्य मिळत नसल्याचे गावातील नागरिक बोलून दाखविले कारण विचारले असता स्वस्त धान्य दुकानासी लिंक केले नसल्याची माहिती दिली फक्त एकाच कुटूंबियाणी लिंक केले असून धान्य मिडत असल्याचे बोलून दाखविले. पिण्याच्या पाण्याची मोठी गंबीर समस्या असून नाल्यातील पाणी आणून पाणी प्यावे लागत असल्याचेही बोलून दाखविले. गावात विहीर मंजूर करून दया अशी ही मागणी केली. सौर ऊर्जेचे काही खांब उभे असून ते फक्त शोभेची वास्तू बनून आहेत . गावात एकही सिमेंट रस्ता किव्हा सरकारची योजना स्वतंत्र्या पासून आज तगायत पोहचलेली नाही.या सर्व समस्या आमदार डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांना आपण निवेदन देऊन पूर्ण करण्याची हमी डॉ,मिताली ताई हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी यावेळी कुर्ता गावातील नागरिकांना दिली आहे. डॉ, मितालीताई हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या आगमनाने गावातील लोक आनंद भारावून गेलेत. हे मात्र विशेष.

