हर्षवर्धनराव व डॉ.मिताली आत्राम यांचीही उपस्थिती.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*सिरोंचा*- तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी)येथील व सिरोंचा पंचायत समितीचे माजी सदस्य समय्या कुळमेथे यांचे हृदयविकारामुळे बुधवार 18 जून रोजी निधन झाले. गुरुवारी फार मोठ्या जनसमुदायाच्या शोकमग्न वातावरणात समय्या कुळमेथे अनंतात विलीन झाले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम व डॉ. मिताली आत्राम यांनी समय्या कुळमेथे यांचे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन अंत्य विधीत सामील होते.
समय्या कुळमेथे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. परिसरात त्यांची फार मोठी लोकप्रियता होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने हळहळ व शोककळा पसरली समय्या कुळमेथे यांच्या अंत्य विधीत राजकीय, सामाजिक , शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील मान्यवर, गावकरी व परिसरातील नागरिक, चाहते, मित्रपरिवार एकंदरीत फार मोठा जनसमुदाय अंत्य विधीत हजेरी लावून अखेरचा निरोप दिले.
*बॉक्स*
*आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचेही शोकसंदेश*
समय्या कुळमेथे हे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे कट्टर व खंदे समर्थक होते त्यामुळे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी एक तळमळीचा व धडपडीचा कार्यकर्ता हरविल्याचे शोकसंदेश देऊन श्रद्धांजली वाहिले आणि आपणही कुळमेथे परिवाराच्या दुःखात सामील असून या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो अशी मनोकामना करून समय्या कुळमेथे यांच्या परिवारा सोबत सदैव पाठीशी राहणार असल्याचे हिंम्मत दिले.

