मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी=*
.
कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी अवजारे, सिंचन साधने, फलोत्पादन इत्यादी घटकांसाठी अर्ज करता येतात.
कृषी अवजारांमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत अवजारे, स्वयंचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे इत्यादी घटकांसाठी अनुदान उपलब्ध आहे. ट्रॅक्टर साठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्या करता 1.25 लाख रुपये अनुदान तर इतर सर्व लाभार्थ्यांकरता 1 लाख अनुदान उपलब्ध आहे. ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये नांगर, कल्टीवेटर, रोटावेटर, थ्रेशर इत्यादी अवजारे 50% अनुदानावरती उपलब्ध आहेत. तसेच स्वयंचलित अवजारांमध्ये बॅटरीचलित/ पेट्रोल/ सौर चलीत फवारणी पंप 50 टक्के अनुदानावर उपलब्ध आहे.
सिंचन साधनांमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिक/ पेट्रोल डिझेल चलित पंप, पाईप, वैयक्तिक शेततळे इत्यादी साधने 50% अनुदानावरती उपलब्ध आहेत.
फलोत्पादन योजनांमध्ये मिरची लागवड, विविध प्रकारचे फळझाडे लागवड, शेडनेट, हरितगृह, पॅक हाऊस इत्यादी घटकांकरिता अनुदान उपलब्ध आहे.
वरील सर्व योजनांकरता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक असून प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम लाभ या तत्त्वावर लाभार्थी निवड करण्यात येत आहे. वरील सर्व योजनांकरता लाभार्थ्यांना सातबारा उतारा, 8अ, बँक पासबुक, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.
वरील योजनांचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची आवाहन तालुका कृषी अधिकारी संदेश खरात अहेरी यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

