मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
*कुरखेडा: -* आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विश्वहिंदू परिषद तालुका मातृशक्ती शाखेच्या वतीने वृंदावन कॉलनी कुरखेडा येथे विश्वहिंदू परिषद मातृशक्तीच्या तालुका अध्यक्षा साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या पुढाकाराने वृंदावन कॉलनी येतील करंजीच्या झाडाखाली सामूहिक योग करण्यात आला. सोबतच दैनंदिन योग केल्याने अनेक फायदे होतात तसेच आरोग्य सुदृढ राहते प्रत्येकांनी दररोज योग केले पाहिजे आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. असे संगीता ठलाल त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्या शुभ प्रसंगी उपस्थित असलेल्या विद्या पुस्तोडे ,वैशाली कुमरे, लता गहाणे,प्राजक्ता सोलंकी, लता जांभूळे, रूपाली पदे,सुनिता सोयाम,गिरीजा मिरी,यामिणी मलगाम,पूर्णा ठलाल,खुशबू तुलावी,हिना मरसकोल्हे, स्वाती डाकळे,संगीता ठलाल, बालगोपाल विभांशु डाकळे,मयंक मलगाम हे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

