मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी*
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आले.
मानवाच्या जीवनात योगा अति आवश्यक आहे. योगाने मानवाचे शारीरिक, मानसिक सुदृढ बनतो म्हणून योगा हे शस्त्र मानवाच्या जीवनात अनन्य महत्व आहे असे मनोगत शाळेचे मुख्याध्यापक के. एम. कोंडागुर्ले यांनी उपस्थितिना संबोधले.
व नागरिक व विद्यार्थी यांनी योगासने,प्राणायाम,सूर्यनमस्कार, व्यायामाचे अनेक प्रकार प्रत्यक्षात करून योगा दिवस साजरा केला आहे
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक के. एम. कोंडागुर्ले, सहा. शिक्षक लक्ष्मण झाडे, शाळा समितीचे अध्यक्ष रमेश बामनकर, उपाध्यक्ष अशोक कोडापे, सदस्य दिलीप मेश्राम, जयश्री आत्राम, सगुणा सोयाम, सुरेश बामनकर, शिल्पा पोरतेठ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

