मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
*अहेरी*==
अहेरी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत हात पंप देखभाल दुरुस्ती कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत सामावून घ्या अशी मागणी केली.आंबेझरा सारख्या अति संवेदनशील नक्षल ग्रस्त भाग असलेल्या ठिकाणी बोरवेल बंद पडलेल्या बोरवेल चे काम करतांना अहेरी पंचायत समिती चे हातपंप देखभाल व दुरुस्ती कंत्राटी कर्मचारी.
विजय सदासीव गेडाम. मनोज पांडुरंग मडावी. प्रवीण किसरवार. विजय मडावी. रामदास मडावी या कंत्राटी कर्मचायांनी सम्पूर्ण अहेरी तालुक्यातील बंद असलेले बोरवेल सुरु करण्याकरिता दऱ्याखोऱ्यातून वाट काडत बैल बंडीच्या साह्याने नदी. नाले. जन्गलातून आपली सेवा करीत आहे. मागील 28 वर्षांपासून कंत्राती पद्धतीने काम करीत असून मानधन फक्त 10 हजार रुपये मदत मीळत आहे. आज मुलांच्या शिक्षण . आरोग्य करीता कुटुंब चा गाडा चावायला.
खुप अडचण निर्माण होत असल्याचे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष जावेद अली. तालुका अध्यक्ष नागेश मडावी. जिल्हा सचिव रतन दुर्गे. जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे यांना दिले असून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. डॉ, आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देऊन हातपंप देखभाल व दुरुस्ती कंत्राटी कर्मचाऱ्यांना जी. पं गडचिरोली स्थायी सेवेत
सामावून घ्यावे अशी विनंती केली व न्याय मिळवून देण्या बद्दल निवेदन देऊन मागणी केली आहे . मागण्या मान्य न झाल्यास अहेरी पंचायत समिती कार्यालया समोर आंदोलन केल्या जाईल असेही राष्ट्रीय मानवधिकारी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांनी निवेदनातून केली आहे.

