वंचितचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांनी निवेदन देऊन सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी केली चर्चा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली,
सन १९८० -८१ मध्ये गडचिरोली ग्रामपंचायत असतांना शहरातील गोकुलनगर व ईंदिरानगर भागात १८१ लाभार्थ्यांना शासनाने बेघर बांधून दिले होते त्यापैकी १२ लाभार्थ्यांना जागेचे पट्टे देण्यात आले परंतु ईतर लाभार्थ्यांना आजतागायत जागेचे पट्टे देण्यात आले नाही त्यामूळे बेघर धारकांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागत आहे, संबंधीत अधिका-यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही गोरगरीब लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याची कैफियत मांडत वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेऊन चर्चा करत जागेच्या संदर्भातील सर्व कागदपत्राच्या पुराव्याचे दस्तावेज दिले.
सहपालकमंत्री जयस्वाल यांनी यावेळी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिका-यांना चार दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले.
गडचिरोली शहरातील बेघरधारकांना जागेचे पट्टे देण्यात यावे यासाठी गेल्या पाच वर्षापासून बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहे.
सहपालकमंत्र्यांना निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते जी.के.बारसिंगे, तुळशिराम हजारे, भोजराज रामटेके, विलास केळझरकर, कवडू दुधे, सोमनाथ लाकडे, विश्वनाथ बोदलकर आदि उपस्थित होते.

