राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेला सरसकट कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही, शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी विद्युत कनेक्शनच योग्य. सोलर पंप ची सक्ती रद्द करा. राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये राज्य सरकारचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता. यात प्रामुख्याने राज्यातील शेतकऱ्यांवर असलेले संपुर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन सुध्दा देण्यात आले होते. सरकार स्थापन होवून आता सहा महिने उलटुन गेले आहे. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलेल्या संपुर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पुर्तता आजपावतो करण्यात आलेली नाही. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की त्यांच्यावरील संपूर्ण कर्ज माफी होईल. परंतु असे होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. तरी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या संपुर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करुन राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करा.
सन २०२१ पासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती पंपांसाठी महावितरण (MSEDCL) कडे पारंपरिक विद्युत जोडणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, २०२५ उजाडूनही अनेक अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सुमारे ११९० शेतकऱ्यांनी विहिरी पूर्ण करून डिमांड अर्ज सादर केलेले असतानाही त्यांना विद्युत जोडणी मिळालेली नाही महावितरणकडून आता या डिमांड अर्जाचे चेक परत करण्याच्या सूचना देण्यात येत असून, शेतकऱ्यांवर सोलर पंप घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. ही सक्ती पूर्णपणे अन्यायकारक आहे. सोलर पंप हे आर्थिकदृष्ट्या महागडे असून त्यातून मिळणारा पाण्याचा फोर्स अपुरा असतो, जो ओलितासाठी पुरेसा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक विद्युत कनेक्शनसह पंपच हवा आहे. महावितरणचे अधिकारी मंत्रालयातील आदेशाचे कारण देत शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढवत आहेत. परिणामी, अनेकांची शेती रखडली आहे व पाण्याअभावी उत्पादनात घट झाली आहे. त्याचे नुकसान कोण भरून काढणार, हा प्रश्नही अनुत्तरितच आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख मागण्या १) २०२१ ते २०२५ या कालावधीत पारंपरिक विद्युत कनेक्शनसाठी केलेल्या सर्व डिमांड अर्जाना तात्काळ मंजुरी द्यावी. २) सोलर पंपाची सक्ती थांबवून शेतकऱ्यांना पर्याय, निवडीचा अधिकार द्यावा. ३) १९९० विहीरधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने पारंपरिक विद्युत कनेक्शन द्यावे. ४) २०२१ पासून झालेल्या शेती नुकसान भरपाई देण्यात यावी.
या प्रलंबित मागण्यावर जिल्हा व राज्यस्तरावर तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा. जर राज्य सरकार व महावितरणने यावर तात्काळ निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करेल असे निवेदन उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, माजी आमदार वसंत बोंडे ,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा निरीक्षक सुरेश गुडधे पाटील,माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंठे पाटील, समुद्रपुर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सहकार नेते वासुदेव गौळकार, हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, सुधाकर खेडकर,ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, दिव्यांग सेल प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, प्रदेश संघटक संदीप किटे,युवल जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, रफिक पत्रकार, अशोक वांदिले, मिलिंद हिवलेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे,अमोल बोरकर, सिंदी शहराध्यक्ष गंगाधर कलोडे,माजी नगरसेवक अशोक पराते, माजी नगरसेवक बालाजी गहलोत,मिलिंद कोपुलवार, माजी नगरसेवक दिनेश देशकरी, राजु भाईमारे,गणेश वैरागडे, विजय तामगाडगे, सरपंच अनिल भगत, सुधाकर वाढई, गजानन गलांडे, गोमाजी मोरे, उपसरपंच प्रवीण कलोडे, विनोद मिलमिले, सुभाष चौधरी, साहेबराव येडे, जगदीश वांदिले, सिद्धार्थ मस्के, श्रीकांत भगत, संदीप चाफले, सुजाता जांभुळकर, मिना सोनटक्के, विद्या गिरी, दिपाली रंगारी, सविता गिरी, आचल वकिल, अंकिता गहलोत, सोनाली बाभुळकर, सुनिल भुते, गजू महाकाळकर, नितीन भुते, सतीश वानखेडे, हेमंत घोडे,गजानन कलोडे, रमेश चतुर, जितू रघाटाटे, सुनील घोडखांदे, दिपक अंबरवेले, किशोर चांभारे, अजय पर्बत, नदीमभाई, बाळा लडके, शेखर निखाडे, सुशील घोडे, अमित रंगारी, पंकज भट्ट, अमर धनविज, सचिन घोडे, आशिष जाधव, साहिल चौधरी, वैभव साठोने, राहुल बोरकर, प्रशांत मेश्राम, आकाश हुरले, राजू मुडे, रवी मेसेकर, रवींद्र बोरकर, आदित्य तडस, मनीष मुडे, कुणाल भुते यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मनोगत…
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. परंतु या तीन तिघाडी सरकारने आश्वासन पूर्ण केलेले नाही, देशात मोठं मोठ्या उद्योगपतीच्या परंतु जगाचा पोशिंदा म्हणत असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ न करता त्याना निवळ आश्वासन देऊन शेतकरी बांधवांचा विश्वासघाट केला आहे.
शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्याची सक्ती राज्य सरकार करीत असून हि सक्ती पूर्ण पणे अन्याय कारक आहे.तसेच सोलर पंप हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या महागडे आहे. शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी विद्युत पुरवठाच योग्य आहे. तरी राज्य सरकारने सोलर पंप ची सक्ती रद्द करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक घेणार…
अतुल वांदिले,प्रदेश सरचिटणीस
रा.कॉ.पक्ष- शरदचंद्र पवार

