पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधि
शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यश पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता व मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णीक यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारी संदर्भात न्याय मिळण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यास सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे सायबर टिमकडे एका मुलीने तक्रार केली कि तीने ऑनलाईन शॉपींग केली. त्यानंतर त्या पार्सल पोहचवण्या करीता अनोळखी इसमाकडून तीला फोन आला. त्याने एक फिशी लिंक पाठवली. त्यालिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रारदार यांचे मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगाराकडे गेला व त्याने तक्रारदार मुलीचे अकांऊट मधुन यु.पी.आय. ट्रान्झॅक्शनद्वारे एकुण ५५,०००/- काढुन घेतले. सदर तक्रारीचे अनुशंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे सायबर टिमने तात्काळ संबधीत वेग-वेगळ्या बँकेची माहीती मिळवून त्यांना संपर्क करुन अकाऊंट फ्रिज करुन तक्रारदार यांचे ४५,०००/- रुपये रिफंड करण्यात यश मिळवले असून, उर्वरित रक्कम रिफंड करीता प्रयत्न चालु आहेत.
दिवाळी व इतर सणांचे तोंडावर ऑनलाईन खरेदी करताना अशा फसवणुकींची शक्यता जास्त आहे. तरी अनोळखी / अनधिकृत लिंकवर क्लिक करु नका. सायबर तक्रारीची नोंद http://cybercrime.gov.in या पोर्टलवर आणि १९३० या हेल्पलाईनवर तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहन पुणे शहर पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी परिमंडळ-१ चे पोलीस आयुक्त, श्रीमती प्रियंका नारनवरे, सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग श्री. रमाकांत माने, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्री गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार, गणपत बालकोळी, आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के महिला पोलीस अंमलदार, रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

