संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा तालुक्यातील ऐतिहासिक गांधी चौकात भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी ठिक ७:३० वाजता ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सोहळ्यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमविला.
यावेळी माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेस अध्यक्षा निर्मलाताई कुडमेथे, सेवादलाचे दिनकर कर्नेवार, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अल्पसंख्याक सेलचे सय्यद सकावत अली, अशोकराव देशपांडे, साईनाथ बतकमवार, पंढरी चन्ने, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, संध्याताई चंद्रशेखर चांदेकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, कविता उपरे, कृष्णा खामणकर, प्रा. रामनंदेश्वर गिरटकर, कूर्मदास पावडे, माजी नगरसेवक विलास तुमाने, गजानन भटारकर, दीपा करमनकर, इरशाद बेग, भास्कर चौधरी, अॅड. प्रशांत अटाळकर, भूषण बानकर, अशोक चैनानी, उईके सर, सय्यद साबिर, वामन वाटेकर, सागर लोहे, साजिद अजिजीया, अशोक राव, रईस अहमद, सरवतउल्ला बेग, जाणी बेग, मुजीब बेग, शेख मजिद, पुणम गिरसावळे यांसह राजुरा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

