मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 सप्टेंबर रोजी शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यप्रणालीसोबतच “८०% समाजकारण व २०% राजकारण” या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने एक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन जिल्हा संपर्कप्रमुख राजजी दिक्षित, जिल्हाप्रमुख राजेश सराफ व शुभांगी ठमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधानसभा प्रमुख राजूभाऊ हिंगमिरे यांच्या पुढाकाराने व हिंगणघाट तालुका प्रमुख अमित गावंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
राज्य विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थानिक प्रभाग क्र. ११ मधील “लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, नगर पालिका हिंगणघाट” जी जिल्ह्यातील पीएमश्री योजनेंतर्गत निवड झालेली एकमेव शाळा आहे येथे विद्यार्थ्यांना चित्रकला वही, स्केचपेन पॉकेट, पाणी बाटल्या व बिस्किट पॅकेटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन म्हस्के सर यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. गिरीधरजी कोठेकर यांनी पीएमश्री योजनेचे महत्व अधोरेखित करताना शाळेतील काही कमतरता मांडल्या व त्यावर उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या तालुका प्रमुख अमित गावंडे व सोनाली गावंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला शिवसेना महिला शहरप्रमुख सुनिता तांबोळी, शहर समन्वयक अमित काळे, उपशहरप्रमुख कुलभूषण वासनिक, विभागप्रमुख सतीश तांबोळी, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश काटकर, शहरप्रमुख अक्षय निकम, विक्रांत राऊत, सौ. चव्हाण, सौ. अडकिणे, श्री. कोठेकर, शाळा समितीच्या सदस्या चौधरी, गावंडे तसेच प्रभागातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी सौ. चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

