अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मिडियाचा पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवने व किरण ताजने यांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात तर चिंताजनक प्रकृती असलेल्या ताजने वर नाशीक येथे अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राज्यभरातून या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया या संघटने कडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करून संघटणेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमाडे यांच्या पुढाकारात रविवारी तारीख २१ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खर्डे व सावनेरचे ठाणेदार उमेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष सुधाकर बागडे, कळमेश्वर तालुकाध्यक्ष मंगेश गमे ,राहुल सावजी, पुरुषोत्तम नागपुरकर सचिन लीडर,,मनोहर घोळसे, वाहिद शेख,शांताराम ढोके,मंगेश उराडे,सतीश वानखेडे,गोपाल सोनवरसे सह मोठ्या संख्येने कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये सदर प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात यावी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे.

