संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सत्य, अहिंसा, सत्याग्रह, स्वदेशी, सविनय कायदेभंग अशा विविध आयुधांचा प्रभावी वापर करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमुल्य योगदान देणारे व भारतीय एकता – अखंडता यासाठी प्राणांची आहुती देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजुरा काँग्रेसच्या वतीने गांधी भवन राजुरा येथे स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, माजी प. स. उपसभापती अब्दुल जमीर, अभिजीत धोटे, अँड. चंद्रशेखर चांदेकर, धनराज चिंचोलकर, उमेश गोरे, हेमंत झाडे यासह तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

