मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*दिनांक 2 ऑक्टोंबर 2025 गडचिरोली जिल्ह्यातील शोषित, वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे ,विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या व आपल्या मानवी न्याय हक्कापासून वंचित असलेल्या आदिवासीं समाजात संविधानिक, न्यायिक अधिकाराबाबत जनजागृती करून त्यांचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आणणारे ,पुण्यात कायद्याचे शिक्षण घेऊन त्याचा उपयोग मूलभूत अधिकारांपासून वंचित असलेल्या आपल्या मातीतल्या माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी करणारे गडचिरोली जिल्ह्यातील तरुण तुर्क युवा वकील बोधीजी रामटेके यांच्या गडचिरोली आगमना निमित्त राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी यांनी बोधी रामटेके यांचे हॉटेल वैभव येथे आगमन झाले यावेळी बोधिजी रामटेके यांचे कौतुक केले व सत्कार करताना काही गोष्टी नकळत डोळ्यासमोरून तरळून गेल्या, रेगडी जवळील अतिसंवेदनशील गाव*
“*वेंगणुर “या गावासंदर्भात अनेकदा बातम्या यायच्या की वेंगणुर गावातील नागरिकांनी डोंग्यातून (नावेतून) प्रवास करून बजावला मतदानाचा हक्क.!… गडचिरोली जिल्ह्यात एडवोकेट बोधीजी रामटेके असताना अनेकदा गडचिरोली चामोर्शी. मुलचेरा तालुक्यातील सुरगाव, गरंजी, पुल्लीगुडम या गावांच्या अनेक समस्या त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. ॲड. बोधी रामटेके यांनी त्यांचे पाथ फाऊंडेशन च्या सहकाऱ्यांसोबत या गावांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फिरून आकडेवारी गोळा केली. उच्च न्यायालयात त्याचा यशस्वी पाठपुरावा केला. बोधीजी आणि पाथ फाउंडेशनने या समस्यांचे पत्रच उच्च न्यायालयाला पाठवले. न्यायालयाने या पत्रातील समस्या पाहता या पत्राची याचिका दाखल करून घेतली. सरकारला उच्च न्यायालयाने म्हणणे मागितले आणि झालेल्या न्यायालयीन सुनावणीत सहा महिन्याच्या आत या गावात रस्ता तसेच पुल बनवण्याचे आदेश दिले होते. बोधीजी रामटेके यांनी या गोरगरीब शोषित वंचित नागरिकांच्या मदतीने केलेल्या संघर्षाला शेवटी न्यायालयीन मार्गाने यश मिळवून दिले आहे.आजही जिल्ह्यातील रस्ता पुल, गडचिरोली जिल्ह्यातील अवैध जंगलतोड, जिल्ह्यातील मानवी हक्काची कुचंबना आणि इतर अनेक मानवी मूलभूत समस्या जोपर्यंत जमिनीवर येत नाहीत तोपर्यंत कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता, यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्र ने या संदर्भात वारंवार बातम्या करून हा मुद्दा महाराष्ट्रातील तमाम जनते समोर आणला होता याबाबत गावकऱ्यांनी मॅक्स महाराष्ट्र चे देखील विशेष आभार मानले होते. नक्षल भागात संविधानाचे शस्त्र हातात घेऊन एका तरुण वकिलाने जिंकलेला हा लढा नक्कीच गडचिरोली जिल्ह्यात खूप प्रेरणादायी होता ……आणी आजही ही लढाई प्रेरणादायी आहे. या लडाई मुळे आज वेंगनूर मध्ये रस्ते झाले, पुलिया झाले या भागाचा विकास होत आहे. येथील वेंगनूर, सुरगाव पल्लीगुड्डम, गावांचा कायापालट होत आहे याकरिता राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली सुद्धा अविरत कार्य व पाठपुरावा करीत आहे. एडवोकेट बोधीजी रामटेके यांच्या प्रेरणादायी या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा चमुने एडवोकेट बोधि रामटेके यांची आई, वडिल प्राचार्य श्याम रामटेके यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरवपूर्ण सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषाताई मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर,सामाजिक कार्यकर्ते जगदीश भाऊ मडावी प्रमोदजी आसूडकर. व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

