मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी:- तालुक्यातील राजाराम येथील आंबेडकर चौकात आज धम्म प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आले. सर्वप्रथम गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या प्रतिमेला मोमबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर पंचशिल मंडळाचे अध्यक्ष श्री.जयराम दुर्गे यांच्या हस्ते निळा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे होते. यावेळी पंचशिल मंडळाचे मनोज आकदर, जयराम, तूलशिराम झाडे, हंनमतू गोंगले, साईनाथ दुर्गे, सुधाकर गोंगले, तिरुपती दुर्गे, विलास दुर्गे, उमाजी शेंगावकर, संतोष दुर्गे, व्येंकटी दुर्गे, लिंबूना गोंगले, रेखा गोंगले तसेच समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

