महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर कोर्टात वकिला द्वारा जुता फेकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने देशात एकच खळबळ माजली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही घटना घडली जेव्हा सरन्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर वकिलांसाठी खटला सुरू होता. राकेश किशोर कुमार असे आरोपी वकिलांचे नाव आहे.
सोमवारी एका वकिलाने भर कोर्टात सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश याच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना एका वकिला द्वारे सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तो ताबडतोब ताब्यात घेतला. निघताना वकिलाने ओरडून सांगितले की, “हिंदुस्थान सनातनचा अपमान सहन करणार नाही.” या घटनेनंतर, सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, “या सगळ्या गोष्टींनी काळजी करू नका. मलाही या गोष्टींनी काळजी नाही.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने वकीलांचा परवाना केला रद्द.: दरम्यान, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (एससीबीए) आरोपी वकील राकेश किशोर कुमार यांचा परवाना रद्द केला आहे. त्यांची नोंदणी 2011 पासूनची आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियानेही आरोपींना तात्काळ निलंबित केले आहे. निलंबना दरम्यान, आरोपी वकील किशोर हा कुठेही प्रॅक्टिस करू शकणार नाहीत. १५ दिवसांत कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली जाईल.

