Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

स्थानिक तलाठ्यांच्या दुर्लक्षामुळे संगमनेर शहर हद्दीतील प्रवरापात्रातून भर दिवसा गाढवांच्या मदतीने वाळूतस्करी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 6, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
स्थानिक तलाठ्यांच्या दुर्लक्षामुळे संगमनेर शहर हद्दीतील प्रवरापात्रातून भर दिवसा गाढवांच्या मदतीने वाळूतस्करी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर : वाळू तस्करी हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून घट्ट झाले आहे. महसूलमंत्र्यांनी कितीही कठोर कारवाईचे संकेत दिले, तरी स्थानिक तलाठ्यांच्या दुर्लक्षामुळे संगमनेर शहर हद्दीतील प्रवरापात्रातून भर दिवसा गाढवांच्या मदतीने वाळूतस्करी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संगमनेर शहर व तालुक्याच्या हद्दीतून वाहणारी प्रवरा नदी वाळूचोरांसाठी वरदान ठरत आहे. दर वर्षी प्रवरेला आलेला पूर मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आणतो. संगमनेर शहर हद्दीसह धांदरफळ, मंगळापूर, कसारा दुमाला, जोर्वे, निंबाळे, तसेच म्हाळुंगी पात्रातून वाळूची रात्रंदिवस वाहतूक सुरू असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर काही वेळा थातुरमातूर कारवाई होते. मात्र शहर व परिसरातील उपनगरे, तसेच शहरालगतच्या गावांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध होते.

शहरालगतच्या गंगामाई घाट परिसरातून तसेच संगमाजवळ, संगमनेर खुर्द परिसरातून जुनाट रिक्षा, ट्रॅक्टर ट्रॉली मधून वाळूचा उपसा सुरु असतो. सध्या नदीपात्रातील पाण्यातूनही वाळू काढून ती बांधकामाला पुरवण्याचा अखंड उद्योग महसूलच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. यावर नियंत्रण असलेले स्थानिक तलाठी व महसूलची यंत्रणा वाळूतस्करी थांबवण्यात फारसा रस घेत नसल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहराजवळच्या गुंजाळवाडीमधील आडमार्गाने, तसेच थेट अकोले बाह्यवळण रस्त्यानेही गाढवावरून वाळूवाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे भर दिवसा सुरु असलेल्या या प्रकारामुळे महसूल विभागाचा धाक संबंधितांना राहिला नसल्याचे दिसते आहे. मध्यंतरी नवनिर्वाचित महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथील आढावा बैठकीत अनधिकृत वाळू उपसा व खडी क्रशरबाबत कठोर भूमिका घेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर गुन्हे दाखल करण्याचेआदेश महसूल यंत्रणेला दिले होते. मात्र तरीही याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

गाढवावरून व इतर कोणत्याच वाहनातून विनापरवाना वाळूची तस्करी हा गुन्हा आहे. कोणी अशी तस्करी करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वाळू तस्करांवरील कारवाईत संगमनेर तालुका जिल्ह्यात अव्वल आहे. :अमोल निकम,तहसीलदार, संगमनेर

Previous Post

मुंबईत दसऱ्या मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटातील समर्थकांना शिवसेनेच्या महिला समर्थकांनी धूतल

Next Post

मुंबई: पोलिसांनी पकडला बनावटी नोटांचा कारखाना, 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुख्य आरोपीला मुंबईतून अटक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई: पोलिसांनी पकडला बनावटी नोटांचा कारखाना, 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुख्य आरोपीला मुंबईतून अटक.

मुंबई: पोलिसांनी पकडला बनावटी नोटांचा कारखाना, 317 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुख्य आरोपीला मुंबईतून अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In