Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन.

Madhukar gongale by Madhukar gongale
October 12, 2025
in Uncategorized
0 0
0
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘सायबर जनजागृती माह’ उपक्रमाअंतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन
. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोंबर 2025 या संपूर्ण महिण्यामध्ये करण्यात येणार विविध सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

दिवसेंदिवस सायबर अपराधांचे तसेच इंटरनेट व समाज माध्यमांद्वारे फसवणुकीचे प्रमाण मोठ¬ा प्रमाणावर वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय आणि I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली, ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्रामध्ये साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 12 ऑक्टोंबर 2025 रोजी ‘सायबर जनजागृती सायकल रॅलीचे’ आयोजन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले.

सदर सायबर जनजागृती सायकल रॅली पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते ट्रेंड्स मॉल, धानोरा रोड येथे आयोजित करण्यात आली. या सायबर जनजागृती सायकल रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे यांचेसह 300 पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व शेवटी या सायकल रॅलीचा शहिद पांडु आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला. या सायबर जनजागृती सायकल रॅलीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा, सायबर फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल साधनांचा सुरक्षित वापर याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्ह्रांचे प्रमाण देखील वाढत असून, प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून स्वतःची माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच या जनजागृती महिन्यात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृती मोहिम, ऑनलाईन वेबिनार्स तसेच सोशल मिडियावरील प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.

सदर सायकल रॅलीप्रसंगी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले आहे की, प्रत्येक नागरिकाने या सायबर जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून सायबर सुरक्षिततेस हातभार लावावा तसेच नागरिकांनी फसवणुकीबाबत सावध राहुन ओटीपी वा वैयक्तिक माहिती सांगू नये व कोणत्याही सायबर फसवणुकीस बळी पडल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930/1945 वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोनि. अरुण फेगडे, सायबर पोलीस स्टेशनच्या मपोउपनि. नेहा हांडे तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

गुडुंजूर गावातील जनतेचा विजय! भाकपच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीस मंजुरी.

Next Post

अपयश म्हणजे शेवट नव्हे ते म्हणजे नव्या सुरुवातीचं आमंत्रण.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
अपयश म्हणजे शेवट नव्हे  ते म्हणजे नव्या सुरुवातीचं आमंत्रण.

अपयश म्हणजे शेवट नव्हे ते म्हणजे नव्या सुरुवातीचं आमंत्रण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In