मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा युथ फेस्ट समितीच्या वतीने आयोजित “एकदिवसीय वर्धा युवा अधिवेशन” कार्यक्रम हिंगणघाट शहरातील तहसिल कार्यालय येथे नुकताच संपन्न झाला. तरुणाईच्या नेतृत्वगुणांना, लोकशाही मूल्यांना आणि सामाजिक बदल घडवण्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देणारा हा अनोखा उपक्रम ठरला.
या अनोख्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या युवा आमदारांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम, प्रभावी आणि विचारपूर्ण मते मांडून लोकशाही संवादाची उत्कृष्ट झलक सादर केली. उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, तहसीलदार योगेश शिंदे , नायब तहसीलदार सागर कांबळे,विद्या विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ . उमेश तुळसकर, ओमकार कुणावार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अंकुश ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यात
सर्वोत्कृष्ट भाषण: पूर्वा कोहोड, सर्वोत्कृष्ट प्रवक्ता मी काय करणार अनिशा येडे, सर्वोत्कृष्ट वेशभूषा उदयराज भोंबले, सर्वोत्कृष्ट वादविवाद प्रज्वल मिलमिले तसेच सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून श्रेयश इंगोले इत्यादी विजेते ठरलेत.
आता हिंगणघाटचे प्रतिनिधी म्हणून वर्धा युथ फेस्ट २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील लोकसभा अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
विधानसभा अध्यक्ष म्हणून कौस्तुभ पाचडे यांनी अत्यंत संयमी आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण सत्राचे संचालन केले. या कार्यक्रमाचे संचालन शामसुंदर बाडंबैल यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोमल वर्मा यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हर्ष उबाळे, बुलबुल ठाकूर, तनुजा चिचघरे, कृष्णा नांदुरकर, सुशांत जीवतोडे, अक्षय मानकर, हिमांशू नरड, रोहन धोटे आणि इतर युवा सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन मोलाचे योगदान दिले. उपरोक्त उपक्रम हा वर्धा जिल्ह्यातील तरुणाईला राजकारण, सामाजिक नेतृत्व आणि लोकशाही प्रक्रियेबद्दलची जाणीव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला असून वर्धा युथ फेस्टिवल हा जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या हक्काचा मंच मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. युवा अधिवेशनाच्या माध्यमातून वर्धा युवा फेस्टिवल समिती नेहमी करत राहील असे मनोगत वर्धा युथ फेस्टिवल समितीचे अध्यक्ष सारंग रघटाटे यांनी यावेळी व्यक्त केले.

